गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत पर्यटन विकासाला चालना: जिल्हा प्रशासन आणि ‘सोबाय टुरिझम’मध्ये सामंजस्य करार

नाईट कॅम्पिंग, ट्रेकिंग, आणि इको-टुरिझम उपक्रमांमुळे स्थानिक रोजगाराला संधी

गडचिरोली : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सोबाय टुरिझम एलएलपी (ट्रायबी टुर्स) यांच्यात आज सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे जिल्ह्यातील विविध नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांवर पर्यटन उपक्रम राबवले जाणार असून, स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे.

या करारानुसार, जिल्ह्यात नाईट कॅम्पिंग, ॲडव्हेंचर टुरिझम, ट्रायबल व इको-टुरिझम, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन तसेच आरोग्य व शैक्षणिक निसर्ग शिबिरे आयोजित केली जातील. मुतनुर, टिपागड, चपराळा अभयारण्य आणि महादेवगड यांसारख्या पर्यटन स्थळांवर कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमणासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. यासोबतच, आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल. होमस्टे प्रकल्पांमुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येईल.

या उपक्रमांमुळे स्थानिक युवकांना गाईड, प्रशिक्षक आणि होमस्टे व्यवस्थापनात रोजगार मिळणार आहे. तसेच, महिलांना हस्तकला आणि स्थानिक पदार्थांच्या विक्रीतून आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळेल. या पर्यटन विकासातून गडचिरोलीचा एक सकारात्मक चेहरा जगासमोर येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button