
तनुश्री आत्राम यांनी वाढवला विद्यार्थांचा उत्साह
अहेरी : अहेरी येथील डी. बी. ए. पब्लिक स्कूलमध्ये लहान मुलांसाठी आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला.
कार्यक्रमात चिमुकल्यांनी श्रीकृष्ण, राधा आणि इतर पारंपरिक वेशभूषांमध्ये सजून सर्वांची मने जिंकली. बालगोपाळांनी मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. तनुश्री आत्राम यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
या कार्यक्रमाला कुलमेथे मॅडम, नेहा पठाण, देशपांडे, आनंद झाडे, मनोज कैदलवार, सुनतकर, मनीषा मुडपल्लीवार, शमीना मॅडम, पल्लवी दहागावकर, निशिगंधा दहागावकर, कशिश शेख, सबा आफरीन आणि मोमिना शेख यांच्यासह अनेक पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.



