गडचिरोलीविदर्भ

धानोरा तालुक्यातील सरपंचांनी तहसीलदारांसमोर मांडल्या समस्या

थकीत देयके आणि खराब रस्त्यांसाठी निवेदन ; समस्या सोडवण्याची मागणी

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सरपंच संघटनेने तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनेक महत्त्वाच्या समस्यांवर निवेदन सादर केले. यात प्रामुख्याने रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी, स्वच्छ भारत मिशनची देयके आणि खराब रस्त्यांचा मुद्दा मांडण्यात आला.

शेत बांधावर वृक्षारोपण आणि सिंचन विहिरीसारख्या कामांची कुशल आणि अकुशल मजुरी तात्काळ उपलब्ध करून द्यावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधलेल्या शौचालयांची थकीत देयके लवकरात लवकर द्यावीत. सरपंच आणि उपसरपंचांना मिळणारे वाढीव आणि थकीत मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते तात्काळ द्यावेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन त्यांची त्वरित दुरुस्ती करावी. या समस्या सोडवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी सरपंच मोहन गावडे, उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, सरपंच चेतन सुरपाम, सरपंच संजय गावडे, सरपंच प्रदीप उसेंडी, सरपंच उषा शेडमाके, सरपंच पूनम किरंगे, सरपंच नंदा दुगा, सरपंच निरंजना नरोटे, सरपंचा विजया सिडाम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button