गडचिरोलीविदर्भ

माजी आ. कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुरूड येथे सभामंडपाचे लोकार्पण

देसाईगंज : आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या सन २०२४-२५ च्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी बळीराजा चौक, कुरूड येथे थाटात संपन्न झाले.

या सोहळ्याला माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभामंडपाचे लोकार्पण ग्रामपंचायत कुरूडच्या सरपंच प्रीती मडावी आणि उपसरपंच शंकर पारधी यांच्या शुभहस्ते तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले.

हा सभामंडप गावातील नागरिकांसाठी एक उपयुक्त सुविधा ठरणार असून, यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी योग्य जागा उपलब्ध झाली आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी पटले, प्रदिप उरकुडे, विलास पिलारे, पलटुदास मडावी, अरुण राऊत, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आदीत्य मिसार, संदिप प्रधान, विनोद दिघोरे, प्रकाश मेश्राम, मनोज दोनाडकर, गुड्डू राऊत तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button