भंडाराविदर्भ

धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

सुसाईड नोटमध्ये ‘मी स्वतः आत्महत्या करते’ असा उल्लेख ; मामाकडे राहून घेत होती नर्सिंगचे शिक्षण 

साकोली : शहरात मंगळवारी सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय प्रेरणा शामराव खोब्रागडे (रा. पंचमटी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या दीड वर्षापासून प्रेरणा साकोलीतील पंचशील वार्डमध्ये आपले मामा कन्नन मनीकंम मुदलियार यांच्या घरी राहून नर्सिंगचा अभ्यास करत होती. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ती घरातील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

प्राथमिक माहितीनुसार, प्रेरणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात तिने स्पष्टपणे ‘मी स्वतः आत्महत्या करते’ असा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षणाच्या उंबरठ्यावर असलेल्या एका तरुण मुलीने अचानक जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतिभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिक चौकशी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे साकोली परिसरातील विद्यार्थी आणि पालकवर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button