गडचिरोलीविदर्भ

चामोर्शीत ‘तान्हा पोळा’ उत्साहात साजरा : बालगोपालांचे सजवलेले नंदीबैल, आकर्षक वेशभूषेने वेधले लक्ष

चामोर्शी: येथील बाजार चौक नगरपंचायतीच्या पटांगणात यंदाही भव्य ‘तान्हा पोळा’ उत्सव व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पारंपरिक सोहळ्यात बालगोपालांनी आकर्षक वेशभूषा, सजवलेले नंदीबैल आणि उत्साही मिरवणुका सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी भूषवले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “तान्हा पोळा व बैल पोळा हे उत्सव आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे आहेत. या माध्यमातून सर्वधर्म समभाव आणि एकोपा निर्माण होतो.” त्यांनी बालगोपालांनी दाखवलेल्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आणि ही परंपरा जपण्याचे आवाहन केले.

यावेळी मंचावर गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, बंडुभाऊ नैताम, वासुदेव चिचघरे तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही शेतकऱ्यांना आणि बालगोपालांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे आयोजन नगरसेवक आशिष पिपरे, सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, नगरपंचायतीच्या सभापती सोनाली पिपरे, नगरसेविका प्रेमा आईंचवार आणि मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले होते.

या उत्सवात मुलांनी नंदीबैल, शेतकरी रूप आणि विविध पारंपरिक वेशभूषा साकारून वातावरण अधिकच रंगतदार केले. खेळणी, रंगीबेरंगी सजावट, नृत्य आणि गाण्यांनी या उत्सवाचे सौंदर्य वाढवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश अधिकारी यांनी केले, तर आभार अमोल आईचवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button