गडचिरोलीविदर्भ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देसाईगंजमध्ये काँग्रेसचे ‘घंटानाद’ आंदोलन

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन

देसाईगंज: धान उत्पादकांचे चुकारे, बोनस, कर्जमाफी, आणि पीक विम्याची भरपाई यांसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसने सोमवारी (२५ ऑगस्ट) देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ‘घंटानाद’ आंदोलन केले. आमदार रामदास मसराम आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धान उत्पादकांचे चुकारे, धानाचा बोनस, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पिक विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी पंपाऐवजी सोलर पंपामुळे तसेच स्मार्ट मीटरमुळे उद्भवलेल्या समस्या, पीक नुकसानीची न मिळालेली भरपाई अशा शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शासनाला निवेदन देऊनसुद्धा फरक पडला नसल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे हे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांना एसडीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवले. त्यामुळे काही काळ काँग्रेसचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आत येण्याची परवानगी दिल्यानंतर परिस्थिती शांत झाली. या वेळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button