गडचिरोलीविदर्भ

महिलांच्या प्रयत्नांतून गांधीनगरात थांबली अवैध दारूविक्री

तीन घरी शोधमोहीम ; पुन्हा अवैध दारूविक्री आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर येथे महिलांनी एकत्र येऊन गावातील दारू विक्री करणाऱ्या विरोधात मोहीम सुरू करून दारू पकडण्याचे धाडसत्र सुरू केले आहे. नुकतेच गावातील महिलांनी गावातील तीन विक्रेत्याच्या घर परिसराची पाहणी करून पुन्हा अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला.

गांधीनगर येथे गेल्या दोन वर्षापासून दारू विक्रीला अतिशय जोर आला होता. गावात जवळपास १६ दारूविक्रेते सक्रिय होते. यामुळे गावातील नागरिक व युवा पिढी दारूच्या व्यसनाधीन झालेली होती. त्यामुळे महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन गावातील दारू बंद करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुक्तिपथ टीमने सधन बैठक, गाव संघटन बैठक घेऊन दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी उपचार शिबिर, दारू विक्रेत्यांना नोटीस देणे असे बरेच कार्यक्रम राबवून जागृती केली. मुक्तीपथ टीमचे तालुका प्रेरक विनोद पांडे यांनी गांधीनगर येथे मुक्तीपथ शक्तीपथ स्त्री संघटन बैठक घेऊन संघटनचे महत्त्व समजावून सांगितले. नवीन संघटना गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी चंद्रकला आत्राम, उपाध्यक्ष शालंदा कनाके तर सचिवपदी रेखा कडते यांची निवड करण्यात आली.

या संघटनेच्या माध्यमातून महीलानी काही दारू विक्रेत्याची दारू पकडून ती नष्ट केली तर काही दारू विक्रेत्याविरोधात गून्हा दाखल करण्यात आला. यामुळे सध्यस्थितीत गावात अवैध दारूविक्री बंद आहे. नुकतेच दारू विक्रीसुरू असल्याची माहिती महिलांना मिळताच मुक्तीपथचे विनोद पांडे, उपसरपंच सुगाबाई आत्राम यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी 3 दारू विक्रेत्याची घर परिसराची पाहणी करून अवैध दारूविक्री गावात चालणार नाही असे ठणकावून सांगितले. बंद केलेली दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात या बाबत पोलीस पाटील मुकेश सिडाम यांनी सांगीतले. गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी शोभाबाई वेलादी, शालू कन्नाके, चंद्रकला आत्राम, नीता परचाके, सुगाबाई आत्राम, मंगलदास करते, विलास चौधरी व गावातील महिला-पुरुष यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button