गडचिरोलीविदर्भ

विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्त राहण्याची शपथ

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथील ममता बहुउद्देशीय शिक्षण संस्था गडचिरोली द्वारा संचालित प्रबुद्ध हायस्कूल येथे तंबाखू व दारूमुक्ती याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व शालेय विद्यार्थ्यांनी तंबाखू व दारूच्या व्यसनातून मुक्त राहण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कृ. टिचकुले यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आनंद दुधे, भूपेश कुळवे, दिलीप बोधे, पंकज येलमुले, डाखरे, वनवे, गोहने,  शिक्षकेतर कर्मचारी मनीषा बांबोळे, कवडूजी येमजेलवार, ऋषीजी वासेकर, नेहाल आभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आनंद इंगळे यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना व्यसनामुळे होणारे दुर्धर आजार याबद्दलची संकल्पना स्पष्ट करून आपण व्यसनमुक्त राहण्यासाठी काय-काय कृती केली पाहिजे याबाबत माहिती दिली. व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम समजून सांगितले व पुढे कोणतेही व्यसन करणार नाही याची शपथ विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी घेतली व आपले महाविद्यालय दारू व तंबाखूमुक्त असले पाहिजे असा ठराव यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भूपेश कुळवे तर आभार दिलीप बोधे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button