गडचिरोलीविदर्भ

शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १२ शिक्षकांची निवड

११ सप्टेंबरला होणार पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक गुणवत्तावंत पुरस्कार २०२५ साठी एकूण १२ शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शिक्षकांचा गौरव सोहळा ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे होणार आहे.

जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १२ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये वनश्री जाधव (वि.शि., जि.प. शाळा गांगाव, गडचिरोली), प्रीती नवघडे (प्रा.शि., जि.प. शाळा कुनघाडा रै, चामोर्शी), शितल कुमरे (वि.शि., जि.प. शाळा बिहीटेकला, कोरची), बालाजी मुंडे (प्रा.शि., जि.प. शाळा बदबदा, कुरखेडा), प्रवीण मुंजमकर (प्रा.शि., जि.प. शाळा बोळधा, देसाईगंज), हेमलता आखाडे (वि.शि., जि.प. शाळा शिवणी बु., आरमोरी), सिंपल मुधोळकर (वि.शि., जि.प. शाळा डुम्मे, एटापल्ली), उज्वला बोगामी (पद.शि., जि.प. शाळा आरेवाडा, भामरागड), मुरली गाइन (प्रा.शि., जि.प. शाळा विजयनगर, मुलचेरा), सुरेखा मेश्राम (प्रा.शि., जि.प. शाळा शिवणीपाठ, अहेरी), रमेश रच्चावार (पद.शि., जि.प. शाळा नगरम, सिरोंचा), विलास दरडे (प्रा.शि., जि.प. शाळा उदेगाव, धानोरा) या शिक्षकांचा समावेश आहे.

११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या गुणवत्तावर्धनाच्या कार्याची दखल घेत त्यांच्या योगदानाला गौरविण्याचा हा उपक्रम असून, शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रेरणा मिळण्याचा हेतू यामागे आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button