गडचिरोलीविदर्भ

काँग्रेस शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात प्रवेश; प्रभाग क्र. ५ मधून रत्नावार यांना उमेदवारी जाहीर

गडचिरोली : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश रत्नावार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये शेकडो कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात झाला.

राकेश रत्नावार यांच्या पक्ष प्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी तातडीने मोठी घोषणा केली. रत्नावार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे प्रभाग क्रमांक ५ छत्रपती शाहूनगर मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार यांनी रत्नावार यांच्यासह प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दुप्पटा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

राकेश रत्नावार यांच्यासह बेबी कुमरे, वैशाली सातपुते, अनिता डोईजड, राजू भारती, विनायक चिचघरे, पुरुषोत्तम सिडाम, किशोर सोनवाणे, पंढरी डोमळे, सुरेश शृंगारपवार, अमोल वोडेवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे पदाधिकारी ओबीसी विभागाचे अध्यक्ष शेमदेव चापले, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, गडचिरोली शहराध्यक्ष एजाज शेख, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हुसेन शेख, जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button