क्राईमभंडाराविदर्भ

९८ हजारांचा गांजा जप्त, दोघांना अटक

तुमसर पोलिसांची कारवाई ; मध्यप्रदेशातून पुरवठा होत असल्याचा संशय

तुमसर : तुमसर शहर व परिसरात गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी रविवार, १४ सप्टेंबर रोजी बालाजी बोरवेल गोडाऊनजवळ नाकेबंदी करून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ९८ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाकेबंदी दरम्यान एका हिरो प्लेझर स्कुटी (एमएच ३६ ई २४३१) वर संशय आल्याने ती थांबवली. तपासणी केली असता, त्यावर असलेले स्वप्निल विकास घोडीचोर (रा. भंडारा) आणि प्रशांत मोरेश्वर कांबळे (रा. भंडारा) या दोघांकडून १.८७२ किलो वजनाचा गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ९८,०८० रुपये आहे.

आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि सहायक पोलिस अधीक्षक महेश माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने केली.

गेल्या काही दिवसांपासून तुमसरमध्ये मध्य प्रदेशातून गांजाचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. यामुळे युवक या व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी या आंतरराज्यीय तस्करांना कायमचा आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button