क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोली ब्रेकिंग ; मोडस्के जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक, दोन महिला नक्षलवादी ठार

AK-47, पिस्तूलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात बुधवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. घटनास्थळावरून पोलिसांनी एक स्वयंचलित AK-47 रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त केले आहे.

गट्टा दलमचे काही नक्षलवादी मोडस्के जंगल परिसरात दबा धरून बसले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सी-60 कमांडो आणि सीआरपीएफच्या जवानांची पाच पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. पोलिसांनी संपूर्ण जंगल परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला.

शोधमोहीम सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. मात्र, सी-60 आणि सीआरपीएफच्या जवानांनी तितक्याच धैर्याने प्रत्युत्तर दिले. काही वेळ चाललेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. घटनास्थळाची तपासणी केली असता, दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

जप्त करण्यात आलेला मोठा शस्त्रसाठा पाहता नक्षलवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले असून, शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button