गडचिरोलीविदर्भ

गटविकास अधिकाऱ्यांची नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयाला भेट

विद्यार्थी व शिक्षकवर्गाच्या कार्याचे केले कौतुक ; ‘शिक्षण हेच यशाची किल्ली‘

एटापल्ली : तालुक्यातील गट्टा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयाला गटविकास अधिकारी आंधळे यांनी नुकतीच भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, शिस्त आणि स्वच्छतेचा आढावा घेत शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आंधळे यांनी शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “एवढ्या अडचणीच्या परिस्थितीतही आपण मुलांना चांगले शिक्षण देत आहात, ही बाब खरोखरच प्रेरणादायी आहे.” विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचे आणि मोठे ध्येय ठेवण्याचे आवाहन केले. “शिक्षण हेच तुमच्या भविष्याची खरी किल्ली आहे. शिस्त आणि मेहनत या दोन गोष्टी अंगीकारल्यास यश नक्की मिळेल,” असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.

विद्यालयातील स्वच्छता व शिस्तबद्ध वातावरण पाहून आंधळे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी शाळा व्यवस्थापनाला भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबवण्याचे सुचवले. या भेटीमुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button