क्राईमवर्धाविदर्भ

कारमधून ड्रग्जची तस्करी ; चौघांना अटक 

६.५२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

वर्धा : नागपूर येथून वर्धा जिल्ह्यात मेफेड्रोन ड्रग्ज (एमडी) वाहतूक करताना चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई २८ रोजी रात्री सिंदी रेल्वे हद्दीतून गेलेल्या नागपूर-वर्धा मार्गावर करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने महागड्या चारचाकीसह पाच मोबाईल, ३२ हजार ८०० रुपयांचे ८.२२ मिलिग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज असा एकूण ६ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सिंदी पोलिसात गुन्हा दाखल केला.

दर्शन हरिभाऊ फुंडे (वय २४, रा. गणेशनगर बोरगाव), अनिस मुकिंद डोंगरे (वय २९, रा. स्टेशनफैल), अनिकेत उर्फ अनुप शंकर ढाले (वय २५, रा. गणेशनगर बोरगाव), वेदांत मंगेश भराडे (वय १८, रा. बोरगाव मेघे) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना नागपूरकडून वर्धा जिल्ह्यात एमडी ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सेलडोह परिसरातील प्लास्टिक खुर्ची फॅक्टरी परिसरात नाकाबंदी केली असता एमएच. ०४ एफोड २८८० क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे एमडी ड्रग्ज मिळून आले. पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून कार तसेच सहा महागडे मोबाईल, असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, महादेव सानप, रामकिसन इप्पर, प्रदीप वाघ, अरविंद इंगोले, अक्षय राऊत, अखिल इंगळे आदिंनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button