
शहर संघटना बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा
गडचिरोली : आरमोरी येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात आरमोरी मुक्तिपथ शहर संघटनेची बैठक पार पडली. यावेळी शहरातील दारू व तंबाखू विक्रीसह विविध अवैधधंदे बंद करण्यासाठी विविध मुद्द्यांवर करून वॉर्डा-वार्डांमध्ये संघटना निर्माण करण्याचे ठरविण्यात आले.
मुक्तीपथ शहर संघटना अध्यक्ष देवेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा विचार विमर्श करून ठराव सर्वानुमते करण्यात आले. यामध्ये आरमोरी शहरातील वार्डात वार्ड संघटना तयार करणे, मजबूत करणे, बळकट करणे. शहरातील ठोक दारू विक्रेत्यांवर कृती कार्यवाही करून अवैध दारू विक्री बंद करणे. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आरमोरी यांचे द्वारा शहरातील वार्डातील अवैध दारू विक्री व तंबाखू बंदीसाठी वारंवार पाठपुरावा घेऊन कारवाई करून घेणे. वार्डामध्ये विविध कृती कार्यक्रम आयोजन करणे, मोहल्ला क्लिनिक आयोजन करणे, तालुका क्लिनिकसाठी पेशंट पाठविणे, वार्डात मुक्तीपथ शक्तिपथ स्त्री संघटना बैठक घेणे इत्यादी विषयावर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
बैठकीला आरमोरी मुक्तिपथ शहर संघटनेचे उपाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, उपाध्यक्ष व सोशल मीडिया प्रमुख भारती मेश्राम, सचिव शुभांगी गराडे, सदस्य प्रीती सारवे, मालन वाकडे, सागर सोनकुसरे, कुंदा झाडे, लता बारसागडे, सुलभा बोरकर, तृष्णा नागापुरे, लक्ष्मी मशाखेत्री, सरोज बोरकर, कल्पना ठवरे, योजना मेश्राम, भावना बारसागडे, कुमुला मेश्राम, शिल्पा मेश्राम, अनुराधा रामटेके इत्यादी शहर संघटन पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून मुक्तीपथ अभियानाची पार्श्वभूमी, मुक्तीपथ उद्देश, रचना, कार्यपद्धतीची माहिती मुक्तिपथ तालुका संघटक विनोद एल. कोहपरे यांनी दिली. बैठकीचे आयोजन नियोजन मुक्तिपथ तालुका उपसंघटक मनीषा जी. प्रधान, प्रेरक बुद्धा पोरटे यांनी केले.



