गडचिरोलीविदर्भ

30 हजारांची देशी व मोहफुलाची दारू जप्त ; दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

गडचिरोली : तालुक्यातील दिभना येथील दारूविक्रत्यांविरोधात पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्त मोहीम राबवित 30 हजारांची देशी व मोहफुलाची दारू जप्त केली. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली तालुका मुख्यालयापासुन जवळच असलेल्या दिभना गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याने गावकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दीभना ग्रामपंचायतला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त असून गाव वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी असते. परंतु,  दारूमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. वाढलेल्या व्यसनामुळे विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अशातच गाव संघटन यांचे गुप्त माहितीचे आधारे पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवून दोन दारू विक्रेत्याची घर तपासणी केली असता करुणा रमेश मरपल्लिवार यांचे कडून 20 टिल्लू देशी दारू अंदाजे किंमत 1600 रुपये तसेच वासुदेव बालाजी मेश्राम याचे कडून 230 टिल्लू देशी दारू व मोहफुलाची दारू 50 लिटर अंदाजे किंमत 28400 रूपये असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित दोन्ही  विक्रत्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने इतर विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार विनोद रणदिवे, वर्षा कवडो, मृत्युंजय मंडल यांनी केली. यावेळी मुक्तीपथचे जिल्हा सहसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक रेवनाथ मेश्राम, पल्लवी पेटकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button