गोंदियाविदर्भ

विभागीय उपसंचालकांकडून आश्रमशाळेतील गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेची पाहणी

जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळांमधील ५ ते १५ वयोगटातील बालकांना अतिरिक्त लसीची मात्रा

गोंदिया: राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये गोवरचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत गोवर व रूबेला लसीकरण मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळांमधील ५ ते १५ वयोगटातील सर्व बालकांना लसीची एक अतिरिक्त मात्रा दिली जात आहे. या मोहिमेची पाहणी करण्यासाठी नागपूर विभागीय उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला.

डॉ. शशिकांत शंभरकर यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील विविध आरोग्यविषयक कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक मार्गदर्शन केले. डॉ. शंभरकर यांनी खडकी येथील स्वामी रामकृष्ण आश्रमशाळेतील गोवर-रूबेला लसीकरण सत्राची पाहणी केली. त्यांनी लसीकरण सत्रातील लाभार्थ्यांची नोंद यु-विन पोर्टल सोबतच ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ पोर्टलवरही करण्याची सूचना दिली. तसेच, किशोरवयीन मुलींच्या हिमोग्लोबिन तपासणीची नोंद योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी आश्रमशाळेतील आरोग्य, आहार आणि निवासी सोयी-सुविधांचाही आढावा घेतला.

यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पी.बी. खोब्रागडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ चाटे, डॉ. अमिता नरडेले यांच्या नेतृत्वात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण करण्यासाठी मदत केली.

डॉ. शंभरकर यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील दुसऱ्या भेटीत प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत बकी मेंढकी गावातील ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ आरोग्य शिबिर व नियमित लसीकरण सत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्यविषयक विविध पोर्टलवरील डेटा एन्ट्री एकाचवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

या भेटीदरम्यान जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कापसे, नागपूर विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक मनीष नंदनवार आणि सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button