
खरकाडी येथे पोलीस विभाग व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील खरकाडी येथील अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून 34 हजार 500 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केल्याची कारवाई धानोरा पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या केली. याप्रकरणी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
खरकाडी येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तीपथ टीमने एका दारूविक्रत्याच्या घरी धाड टाकून पाहणी केली असता, देशी व विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करीत 34 हजार 500 रुपये किमतीची दारू जप्त केली. संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गावात खळबळ निर्माण झाली असून इतर दारू विक्रेत्यावर पोलिसांनी पाळत ठेवली आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जंगले, पोलिस हवालदार भजनराव गावडे, पोलिस शिपाई प्रवीण राऊत, जान्हेरसिंग उसेंडी, विक्रांत मोहुर्ले, रेणुका मडावी येरमा यांनी केली. या कृतिमध्ये मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकर, मुक्तीपथ कार्यकर्ती शीतल गुरनुले सहभागी झाले होते.



