गडचिरोलीविदर्भ

प्रभाग क्र. ७ मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

‘भारतीय संविधान राष्ट्राचा प्राण’ – ॲड. प्रणोती निंबोरकर ; समानता, स्वातंत्र्य मूल्यांची पुनर्प्रतीज्ञा

गडचिरोली : भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया असलेल्या संविधान दिनाचे औचित्य साधून बुधवारी प्रभाग क्रमांक ७ येथील जनसंपर्क प्रचार कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याने झाली. यावेळी उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि युवा वर्गाने संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेच्या मूल्यांची पुन्हा एकदा प्रतीज्ञा व्यक्त केली.

नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “भारतीय संविधान हे आपल्या राष्ट्राचे प्राण आहे. लोकशाहीला दिशा देणारे आणि प्रत्येक नागरिकाचे हक्क सुरक्षित करणारे हे संविधान जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संविधान रचनेतील सर्व महामानवांचे आपण सदैव ऋणी आहोत.”

प्रभागातील नागरिकांनीही संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत भारताच्या प्रगत, न्याय्य आणि समताधिष्ठित भविष्यासाठी कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button