गडचिरोलीविदर्भ

नगरपरिषद निवडणुकीसाठी ‘रिपब्लिकन आघाडी’ची घोषणा!

विविध आंबेडकरी संघटनांची मोट ; अल्पसंख्याक, आदिवासी समुदायाला सोबत घेऊन लढणार निवडणूक

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येत ‘रिपब्लिकन आघाडी’ तयार करण्याची घोषणा केली आहे. ही आघाडी नगर परिषदेच्या निवडणुका लढविण्यासाठी सज्ज झाली असून, अल्पसंख्याक समुदाय, मुस्लिम, आदिवासी आणि ख्रिचन समुदायातील संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

शहरातील काही ‘तथाकथित आंबेडकरी संघटनांनी’ एकत्रित येऊन यापूर्वी ‘परिवर्तन पॅनेल’ तयार केले होते. मात्र, सक्रिय आंबेडकरी संघटनांना हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याची गंभीर दखल घेत, शहरातील रिपब्लिकन जनतेने ९ नोव्हेंबर रोजी स्वयंस्फूर्तीने एकत्रित येत ‘रिपब्लिकन आघाडी’ ची घोषणा केली आहे.

सदर बैठकीचे अध्यक्षस्थान शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे यांनी भूषविले. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, रिपब्लिकन पक्ष (आंबेडकर) पंडित मेश्राम, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद राऊत, वंचितचे नेते गजानन बारसिंगे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रशांत मडावी, आदिवासी संघटनेच्या नेत्या वर्षा कन्नाके, परिवर्तन पॅनलच्या वनिता बांबोळे, रिपब्लिकन पार्टीचे नेते गोपाल रायपुरे, मारोती भैसारे, दशरथ साखरे, जीवन मेश्राम (सचिव), रोशन उके, चोखोबा ढवळे, नाजुक भैसारे आणि दिलीप गोवर्धन यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button