
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UIT), अडपल्ली मध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त नुकताच ‘अभियंता दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्रिवेणी अर्थमूव्हर्स प्रा. लि. चे वरिष्ठ महाव्यवस्थापक, जीवन हेडाऊ उपस्थित होते, तर युआयटीचे प्रभारी संचालक, प्रा. मनीष डी. उत्तरवार हे अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण प्रमुख पाहुण्यांनी केले आणि विजेत्या तसेच उपविजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात शाश्वत विकासासाठी निर्सगाचा संतुलन साधून तंत्रज्ञानाचा उपयोग औद्योगिकीकरणासाठी केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर युआयटीच्या स्थापनेमूळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाकरीता हातभार लावणार असे मत सन्मानीय अतिथी प्रभारी संचालक, युआयटी, प्रा. मनीष डी. उत्तरवार यांनी केले. आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे जीवन हेडाऊ याच जिल्ह्याचे रहिवासी असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप आनंद झाला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दरम्यान विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या गणित विभागाचे सहाय्यक प्राध्यापक, डॉ. निखिल एम. हुलके यांनी समन्वयक म्हणून काम केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेच्या संचालकांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करुन अभिनंदन केले.



