गडचिरोलीविदर्भ

रिपब्लिकन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार – बाळासाहेब खोब्रागडे

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा मेळावा संपन्न

गडचिरोली : रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना एकत्र करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संपूर्ण ताकतीने लढवू अशी घोषणा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी केली.

पक्षाच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, अशोक निमगडे, संत सैनिक दलाचे अशोक टेंभरे, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष राजस खोब्रागडे, कम्युनिस्ट पार्टीचे देवराव चवडे, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश सचिव प्राचार्य प्रकाश दुधे ज्येष्ठ नेते पुनेश्वर दुधे, डॉ. हरिदास नंदेश्वर, सुरेखा बारसागडे, केंद्रीय सदस्य राजा खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, अरुणा राऊत, बौद्ध महासभेचे प्रा. गौतम डांगे, विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवा आघाडीचे नरेंद्र रायपुरे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

रिपब्लिकन चळवळ मजबूत व गतिमान करणे आज काळाची गरज आहे असे सांगून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या काळातील पक्षाचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही बाळासाहेब यांनी यावेळी केले.

रोहिदास राऊत म्हणाले, रिपब्लिकन पक्ष नेहमीच दाली शोषित लोकांसाठी संघर्ष करीत राहिलेला आहे आणि हा संघर्ष अजूनही सुरूच आहे. भूमिहीनांच्या सत्याग्रहा सहित या पक्षाने केलेली अनेक आंदोलने आजही लोकांच्या स्मरणात आहेत. निवडणुकीच्या राजकारणातही पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. आज पुन्हा एकदा या पक्षाला बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे.

रिपब्लिकन पक्ष हे एका आंदोलनाचे नाव आहे असे सांगून अशोक निमगडे यांनी पक्षाच्या गत काळातील इतिहासाचा आढावा घेतला आणि रिपब्लीकन पक्षच सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी अन्य मान्यवर पाहुण्यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली व सर्वांनी रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यावर भर दिला.

या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून अनेक महिला तथा पुरुष कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रकाश दुधे, संचालन प्रा. राजन बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र रायपुरे यांनी केले. मेळाव्याला हेमचंद्र सहारे, पुण्यवान सोरते, चंद्रभान राऊत, सुखदेव वासनिक, सिद्धार्थ खोब्रागडे, दुर्योधन सहारे, पुनेश्वर वड्डे, अरुण भैसारे, भारत जांभुळकर, प्रेमेंद्र सहारे, दादाजी धाकडे, एकनाथ अंबादे, महिला आघाडीच्या डॉ. अंकीता  धाकडे, वनमाला झाडे, कल्पना रामटेके, ज्योती चौधरी, गेंदाबाई गोडबोले यांचेसह जिल्ह्याच्या विविध भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button