गडचिरोलीविदर्भ

मॅरेथॉन स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील खुटगाव येथे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी 40 युवक-युवतींनी तयारी दर्शविली.

खुटगाव येथे आयोजित बैठकीत दारूविक्रीबाबतची सध्यास्थिती जाणून घेतली. सोबतच गावात सुरु असलेली अवैध दारूविक्री बंदीसाठी करावयाच्या उपाययोजना समजावून सांगितले. गाव विकासाठी दारूबंदी का गरजेची आहे. ही बाब मुक्तिपथ टीमने पटवून दिले. सोबतच आपल्या गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांसह युवकांनी गाव संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान, दारुमुक्तीची मशाल पेटवून मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिला-पुरुष, युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित दारूबंदीच्या समर्थनात लढा देण्याची तयारी दर्शविली. या स्पर्धेत 40 जणांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मुक्तीपथचे कमलकिशोर खोब्रागडे, पोलिस पाटिल दिलीप लोंढे, सदस्य अर्चना बोमनवार, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल मडावी, गाव संघटन दुर्गा मडावी सह इतर गवसांघटन महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुळकर, भास्कर कड्यामी व टीमने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button