गडचिरोलीविदर्भ

सार्वजनिक संस्थांनी लोकसंख्येबाबत जागरूक राहुन प्रचार करणे गरजेचे – उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर

महात्मा गांधी महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जागृती कार्यक्रम

आरमोरी : जगाच्या अनेक समस्येत लोकसंख्या ही प्रमुख समस्या आहे. पृथ्वीवर जगण्याच्या संघर्षातून व स्पर्धेतून विविध समस्यांचा उगम होतो. आज आठ नऊ अब्जापर्यंत जगाची लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्येची अतिरिक्त वाढ देशाच्या विकासाला अडचण ठरते. 11 जुलै 1987 ला पाच अब्ज लोकसंख्या झाल्यानंतर लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम मानवाला भेडसावू लागले आणि 11 जुलै 1989 पासून लोकसंख्या जागृती दिन म्हणून युनोने प्रारंभ केला. त्या दिनाचे औचित्य व महत्त्व समजून जगात प्रत्येक महाविद्यालयात हा जागृती कार्यक्रम घेतला जावा. यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी सर्व सार्वजनिक संस्थांनी पुढे येवून प्रचार केला पाहिजे. महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल मी त्या विभागाचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी केले.

महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागब, राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 जुलै 2024 ला महाविद्यालयाच्या भूगोल विभागात जागतिक लोकसंख्या दिन आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मंचावर उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाचे प्रा. दिलीप घोनमोडे, भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. पराग मेश्राम व प्रा. डॉ. विजय गोरडे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय गोरडे यांनी 11 जुलै या दिवसाचे औचित्य व महत्त्व विशद करताना तरुण पिढीने या दिनानिमित्त जागृत झाले पाहिजे, आपण या देशातच नव्हे तर या जगाचे एक घटक आहोत कोणतेही चांगले वाईट कार्य जगाला प्रभावित करते. छोट्या देशांना कमी लोकसंख्या अडचणीची ठरत असली तरी सरासरी दृष्टीने विचार केला तर जगात जास्त लोकसंख्येमुळे विकास खुंटल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नवीन पिढीने लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम समजून जागृत झाले पाहिजे, लोकसंख्या वाढ थांबविण्यासाठी प्रचार केला पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते प्रा. पराग मेश्राम यांनी सुद्धा उपस्थितांना  लोकसंख्या वाढीची कारणे, दुष्परिणाम आणि समस्या यावर समायोजित मार्गदर्शन केले आणि नव्या पिढीपुढे जागृती केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप घोनमोडे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. विजय गोरडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. गजेंद्र कढव यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. मनोज ठवरे, प्रा. मोहन रामटेके, प्रा. गजेंद्र कढव, प्रा. डॉ. सतीश कोला, प्रा. सत्येंद्र सोनटक्के, प्रा. डॉ. वसंता कहालकर, प्रा. डॉ. विजय रैवतकर, प्रा. गजानन बोरकर, प्रा. वैभव पडोळे, प्रा. सुनंदा कमरे, प्रा. डॉ. कविता खोब्रागडे, प्रा. कु. कुर्झेकर, प्रा. कु. गवळी, प्रा. दीक्षा वनमाळी, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button