
गोंदिया : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने समोरील सायकलस्वाराला जबर धडक दिली. झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गोंदिया आमगाव मार्गावरील माहेश्वरी साल्वेंटचे समोर शनिवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास घडली. निळेश्वर बुधराम भेदे असे मृताचे नाव असून, तो खमारी येथील रहिवासी आहे.
ट्रक गोंदिया येथून आमगावकडे जात होता. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. समोर असलेल्या सायकलस्वारास जबर धडक दिली. ही धडक भयावह असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडताच ट्रकचालक पसार झाला. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध भादंवि २७९, ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सिंगनजुडे करीत आहेत.



