क्राईमगडचिरोलीविदर्भ

गडचिरोली पोलिसांकडून ६.३८ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, एकाला अटक

गडचिरोली : जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने २० जुलै रोजी मोठी कारवाई केली. शिवणी येथील मनोज वामन ऊईके याच्याकडून ६ लाख ३८ हजार ८०० रुपये किमतीची अवैध देशी-विदेशी दारू आणि स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मनोज ऊईके हा गडचिरोली शहरात आपल्या स्विफ्ट कारमधून दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गडचिरोली-चामोर्शी रोडवरील सेमाना मंदिराजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, २५ बॉक्स देशी दारू आणि ४ बॉक्स विदेशी बिअर आढळून आले. पोलिसांनी अवैध दारूसह चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख ३८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मनोज ऊईके याने ही दारू किरण तटपल्लीवार आणि लंकेस यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात मनोज वामन ऊईके, किरण ताटपल्लीवार आणि लखन ऊर्फ लंकेस यांच्याविरोधात कलम ६५ (अ), ९८ (२), ८३ महा. दा. का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनोज वामन ऊईके याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सफौ कैलास नरोटे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, पोहवा दंडीकवार, पोअं पंचफुलीवार व पोअं कोडाप यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button