गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत ‘श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा’; चार दिवस भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

​गडचिरोली : येथील गोकुळनगर बायपास रोड परिसरातील ‘इच्छापूर्ती शिव-साई-नाग मंदिर’ (डॉ. मलिक यांच्या दवाखान्यामागे) येथे श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात २४ जून रोजी होणार असून, २७ जून पर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.

​श्री दादाश्री बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली, श्री दादाश्री बहुउद्देशीय महिला बचत गट, गडचिरोली, मानवता पथ भक्ती गुरुमार्ग (महाराष्ट्र) आणि समस्त मानवता पथ परिवार यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे महादेव मंदिराचे लोकार्पण, तसेच शिवलिंग आणि नागदेवता यांच्या मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

​​बुधवार, २४ जून: सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ७ या सत्रांत देवपूजन, जलाधिवास, पुष्पाधिवास, धृताधिवास, हवनपूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ​गुरुवार, २५ जून: सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ७ या वेळेत देवपूजन, धान्याधिवास, मिष्ठान्नाधिवास, औषध्याधिवास, हवनपूजन व आरती होईल.

​शुक्रवार, २६ जून: सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ७ या सत्रात देवपूजन, वस्त्राधिवास, धूपाधिवास, शियाधिवास, हवनपूजन व आरती पार पडेल. शनिवार, २७ जून: सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी ९ वाजता मूर्ती स्थापना, अभिषेक, श्रृंगार दर्शन आणि पूर्णाहुती आरती संपन्न होईल. त्यानंतर वृद्ध आश्रमात भोजनदान करून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

​समस्त मानवता पथ परिवार आणि भाविकांच्या स्नेहभावातून आयोजित या मंगलप्रसंगी गडचिरोलीतील नागरिकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button