गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्नेहनगर, विसापूर परिसरात नागरिकांशी साधला संवाद

गेट, सभागृह दुरुस्ती आणि जिमच्या समस्या त्वरित सोडवण्याचे दिले निर्देश

गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मंगळवार आणि बुधवारी शहरातील स्नेहनगर आणि विसापूर परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

स्नेहनगर परिसरात आमदार डॉ. नरोटे यांनी नागरिकांशी भेटून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यात गेट आणि सभागृह दुरुस्ती. सभागृहात टाईल्स आणि हाय मास्ट लाईट्स बसविणे. सिमेंट खुर्च्या बसविणे आणि शिव मंदिर परिसरातील ओपन जिमची दुरुस्ती. जय बजरंगबली विश्वस्त मंडळाच्या कामकाजाबाबतही चर्चा करण्यात आली.

डॉ. नरोटे यांनी विसापूर हेटी येथेही भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. या समस्यांवर आवश्यक ती कार्यवाही करून लवकरच निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. “गडचिरोली शहरातील नागरिकांच्या सुविधा आणि विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील,” असे आश्वासन डॉ. नरोटे यांनी यावेळी दिले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर यांच्यासह स्थानिक युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विसापूर हेटी येथे माजी सभापती केशव निंबोड, माजी सरपंच भास्कर कोटगले व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button