गडचिरोलीविदर्भ

महिला सक्षमीकरणाला ‘माविम’चे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिला बचत गटांना ३ कोटींच्या फिरता निधीचे वाटप

गडचिरोलीतील ३०६१ बचत गटांना फायदा ; बिरसामुंडा गटाला पहिला निधी वितरित

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाने (‘माविम’) गडचिरोली जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या कार्याला मोठा आधार दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते माविमच्या महिला बचत गटांना ३ कोटी रुपयांच्या फिरता निधीचे (Revolving Fund) वितरण करण्यात आले. अहेरी तालुक्यातील बिरसामुंडा महिला बचत गट, राजाराम यांना हा पहिला फिरता निधी देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

माविमद्वारे गडचिरोली जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे कार्य सक्रियपणे सुरू आहे. जिल्ह्यात ४१९ गावांमध्ये ३०६१ महिला बचत गट असून, त्यामध्ये ३४,८९५ महिला सहभागी आहेत. या महिला बचत गटांच्या माध्यमातून दुध संकलन केंद्र, वनउपज संकलन, हळद लागवड व प्रक्रिया युनिट, हातसडीचे तांदूळ निर्मिती, जांभूळ प्रक्रिया युनिट, कुक्कुटपालन युनिट, मोहलाडू युनिट यासारखे विविध उपप्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी १०३ विक्री केंद्रे देण्यात आली असून, महिलांचे शेतीवर आणि बिगर शेतीवर आधारित वैयक्तिक व्यवसायही सुरू आहेत.

सन २०२३-२४ वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजना महिलासाठी 3% राखीव निधी मधून रु. १.५० कोटी फिरता निधी व्यवसायासाठी गटाद्वारे १५० महिलांना देण्यात आला. महिलांनी चिकाटीने आपला व्यवसाय उभा करून व्यवसायातील उत्पन्नातून फिरता निधीची परतफेड केली. आलेल्या परतफेडी मधून आणखी ६० महिलांना गटांनी फिरता निधी व्यवसायासाठी दिला. एकूण २१० महिलांचे विविध प्रकारचे उद्योग सुरु झालेले आहे, आणि व्यवस्थित परतफेड सुध्दा सुरु आहे.

सदरहू योजनेचे यश बघता सन २०२५-२६ वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) महिलांसाठी राखीव 3% निधी मधून रु. ३ कोटी फिरता निधी प्रति गट रु. १ लाख प्रमाणे मंजूर करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button