
देसाईगंज : ‘व्हाईस ऑफ मीडिया’ (Voice of Media) आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शिखर अधिवेशनासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पत्रकार देसाईगंज (वडसा) येथून रवाना झाले. अधिवेशनाला जाणाऱ्या गाडीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे आणि डीपी़डीसी सदस्य तथा उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष आकाश अग्रवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छांसह रवाना करण्यात आले.
यावेळी नरेश विट्ठलानी, राजू आकरे, जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक शामराव बारई गुरुजी, व्हाईस ऑफ मीडिया गडचिरोली जिल्ह्याचे सरचिटणीस विलास ढोरे, जिल्हा साप्ताहिक विंगचे संघटक प्रकाशचंद्र दुबे, सदस्य पुरुषोत्तम भागडकर, पंकज चहांदे, रवींद्र कुथे यांच्यासह कुरखेडा व धानोरा येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



