गडचिरोलीविदर्भ

कॅन्सरग्रस्त रुग्णाला हर्षवर्धनबाबा आत्राम यांचा आधार ; उपचारासाठी केली आर्थिक मदत

एटापल्ली तालुक्यातील हिचामी कुटुंबाला संकटात दिला मदतीचा हात ; उपचाराची जबाबदारी ‘स्नेहा धर्मार्थ दवाखाना’ मार्फत उचलणार

एटापल्ली: एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील रहिवासी बाजू हिचामी हे कॅन्सर या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहेत. उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च पाहता त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले होते. ही गंभीर परिस्थिती समजताच युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी तात्काळ सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आणि स्वतः आर्थिक मदत करून हिचामी कुटुंबाला मोठा आधार दिला.

केवळ आर्थिक मदत न करता, हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी हिचामी कुटुंबाला दिलासा देणारे मोठे आश्वासन दिले. स्नेहा धर्म धर्मार्थ दवाखाना यांच्या माध्यमातून बाजू हिचामी यांच्या वारंगल कॅन्सर हॉस्पिटलमधील संपूर्ण उपचाराची जबाबदारी उचलण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या हिचामी कुटुंबाच्या डोळ्यांत आशेचे नवे प्रकाश फुलले.

हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी गरजूंच्या मदतीसाठी हात पुढे केल्याबद्दल एटापल्ली तालुक्यात सर्वत्र त्यांच्या या मानवीय उपक्रमाचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याला समाजातील युवा नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श म्हणून पाहिले जात आहे.

या प्रसंगी झारेवाडा येथील उपसरपंच उमेश हिचामी, चेतन हिचामी, सूरज जाधव, तिरुपती मडावी, योगेश तलांडे, आकाश राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button