गडचिरोलीविदर्भ

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला ऐतिहासिक व लष्करी वारसा

गोंडवाना सैनिकी विद्यालयाची नागपूर-कामठीत सहल ; दीक्षाभूमी, महाराज बागसह ‘ब्रिगेड ऑफ द गार्ड्स‘चे केंद्र असलेल्या कामठी लष्करी छावणीला भेट

गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या सैनिकोत्सव सत्र २०२५-२६ च्या दुसऱ्या टप्प्यात वर्ग ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय नागपूर-कामठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तूंसोबतच लष्करी ज्ञान देणे हा होता.

या सहलीत विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात आली: विद्यार्थ्यांनी कामठी येथील कामठी लष्करी छावणीला भेट दिली. हे ‘ब्रिगेड ऑफ द गार्ड्स’चे केंद्र असून राष्ट्रीय कॅडेट्स कॉर्प्ससाठी (NCC) असलेली ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी येथे आहे, जी अशा प्रकारची देशातील एकमेव अकादमी आहे. विद्यार्थ्यांनी येथील ‘रेझन डेट्रे’चा अनुभव घेतला. नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती मिळवली. महाराज बाग येथील प्राणी संग्रहालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्राण्यांमधील जैवविविधता जाणून घेतली.

शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि माहिती मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button