गडचिरोलीविदर्भ

आदर्श पदवी महाविद्यालयाच्या प्रणाली सहारेची कुलू येथील साहसी प्रशिक्षणासाठी निवड

देशभरातील निवडक NSS स्वयंसेवकांसाठीच्या ‘डिजास्टर रेस्क्यू‘ शिबिरात आदर्श पदवी महाविद्यालयाचा सहभाग

गडचिरोली : हिमाचल प्रदेशातील पर्यटन आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुलू येथील रिव्हर रॅप्टिंग सेंटर पिरडी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांसाठी आयोजित १० दिवसीय ॲडव्हेंचर स्पोर्ट्स व डिजास्टर रेस्क्यू प्रशिक्षण कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या प्रतिष्ठित शिबिरासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या आदर्श पदवी महाविद्यालय येथील बी.एस्सी. डेटा सायन्स द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रणाली सहारे हिची निवड झाली असून, तिने महाविद्यालयाचा आणि विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे.

या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश तरुणांना साहसी उपक्रमांद्वारे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत बचावकार्य पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा आहे. रिव्हर रॅप्टिंग, माउंटेन ट्रेकिंग, रेस्क्यू ऑपरेशन, फर्स्ट एड, लाईफ सेव्हिंग टेक्निक्स यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटकांचा या प्रशिक्षणात समावेश आहे. या प्रशिक्षणातून तरुणांमध्ये नेतृत्वगुण, टीमवर्क, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित होतो. तसेच, विद्यार्थ्यांना साहसी क्रीडा, पर्यटन आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित करिअरचे दरवाजे खुले होतात.

प्रणाली सहारेच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम खंडारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर, प्रा. विजया उके यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले आहे. प्रणाली भविष्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साहसी क्रीडा क्षेत्रात योगदान देण्याची तयारी दर्शवत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button