
गडचिरोली : 20 फेब्रुवारी रोजी सोमनपल्ली येथील बस स्थानकावर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील तमाम आंबेडकरी समूहाच्या भावना दुखावलेले आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झालेला आहे.
त्यामुळे या अवमानाचा सन्मानात रूपांतर करण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच अवमान करणाऱ्यांच्या मानसिकतेला धडा शिकवण्यासाठी त्याच बस स्थानकाला “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक सोमनपल्ली” असे नामांतर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीरपणे सन्मान करावा, अशी मागणी आझाद समाज पार्टी गडचिरोली व आष्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासोबत सदर प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्यात यावी ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन चामोर्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांच्याकडे सादर करण्यात आले.
निवेदन देताना आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, विवेक खोब्रागडे, प्रकाश बनसोड, धनराज दामले, सतीश दुर्गमवार, प्रतीक डांगे, सिद्धांत भडके, निखिल कोपरे, हरीश शेडमाके, अश्विन निमरड, बनतेस निमसरकार, सूर्यकांत चांदेकर आदी असंख्य कार्यकर्त्यांसहित सोमनपल्ली येथील रहिवासी उपस्थित होते.



