गडचिरोलीविदर्भ

लगाम चेक येथे माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन

राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे मार्गदर्शन ; नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण

मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील चुटूगूंट्टा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लगाम चेक येथे माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने संपन्न झाले. यामुळे परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची धार्मिक अपेक्षा अखेर पूर्ण होत आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे थेट मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. स्थानिक विकासकामांमध्ये नेहमीच सक्रिय असणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी या मंदिर बांधकामाच्या उपक्रमाची पुढाकाराने धुरा सांभाळली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प आता आकार घेत असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भूमिपूजन विधी मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह पार पडला. उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले की, या माता मंदिराच्या उभारणीमुळे परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक बळकट होईल, तसेच भाविकांसाठी एक केंद्रस्थळ निर्माण होईल.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, प्रफुल नागूलवार, सरपंच साधना मडावी, पोलीस पाटील प्रेमकला पेंदाम, हनुमंतू आत्राम, जयराम दाडजाम, गोपाळ पेंदाम, मारोती आत्राम, मधुकर पेंदाम, मोहन गेडाम, मनोज पेंदाम, नीलकंठ आत्राम, दिलीप चाहकाटे, कविता आत्राम, वंदना आत्राम, निरूपा सिडाम, शारदा आत्राम, अशोक आत्राम, किशोर आत्राम, किशोर सिडाम तसेच ग्रामस्थ, महिला आणि युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button