गडचिरोलीविदर्भ

इंदिरानगर, स्नेहनगर प्रभाग क्र. ०३ येथील भाजपच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन

इंदिरानगर बसवण्यात भाजपाचेच योगदान – प्रमोद पिपरे

गडचिरोली : इंदिरानगर प्रभाग क्र. ०३ येथील भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रणोती सागर निंबोरकर आणि नगरसेवकपदाचे अधिकृत उमेदवार अनिल पांडुरंग कुंनघाडकर (अ), सौ. योगिता प्रमोद पिपरे (ब) यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन २६ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले.

इंदिरानगर, स्नेहनगर प्रभाग क्र. ०३ येथील या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. अशोक नेते (राष्ट्रीय महामंत्री, आदिवासी मोर्चा) आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याप्रसंगी जिल्हानिवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, विलास भांडेकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. प्रणोती निंबोरकर, नगरसेवकपदाचे उमेदवार योगिता प्रमोद पिपरे (जिल्हा अध्यक्ष, भाजपा महिला आघाडी) आणि अनिल कुनघाडकर (माजी उपाध्यक्ष व भाजपा शहर अध्यक्ष, गडचिरोली) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद पिपरे यांनी आपल्या भाषणात इंदिरानगरच्या वस्तीसाठी भाजपा नेत्यांनी केलेल्या कामावर भर दिला. ते म्हणाले की, इंदिरानगर बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार अशोक नेते, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे आणि मी स्वतः झटलो आहे. वनविभागाकडून वारंवार वस्ती हटवण्याचे प्रयत्न झाले, परंतु आम्ही इंदिरानगरातील वस्तीला हात लावू दिला नाही आणि ही वस्ती वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

इंदिरानगर वनविभागाच्या जागेवर वसलेला असल्यामुळे अतिक्रमण धारकांना घराचे पट्टे मिळण्यास विलंब होत असल्याचे पिपरे यांनी नमूद केले. नगर परिषदेवर भाजपाची एक हाती सत्ता दिल्यास, प्रत्येक घराचे गावठाण सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम केले जाईल, तसेच सर्वांना घरकुल देण्यात येईल, असे त्यांनी वचन दिले. ते पुढे म्हणाले की, नागरिकांना भरपूर आणि दोन वेळा नळाचे पिण्याचे पाणी मिळेल. नवीन सिमेंट काँक्रिट रस्ते, बंदिस्त सिमेंट काँक्रिट नालीचे बांधकाम व अशा अनेक सुखसुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे.

यावेळी बंडु झाडे, नरेश हजारे, सागर निंबोरकर, चंदा बुरांडे, नरेंद्र भांडेकर, नानाजी सुरपाम, रत्नमाला शेटे, वनिता सुरपाम, यशवंत झरकर, तसेच प्रभागातील भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button