
गडचिरोली : भरतपुर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या 5व्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पैलवान हितेश चंद्रभान सोनवाने यांनी झळाळती कामगिरी करून विद्यापीठाचा राष्ट्रीय पातळीवर लौकिक वाढवला आहे. ग्रीको-रोमन प्रकारातील 60 किलो वजन गटात त्याने दमदार खेळ सादर करत कास्य पदक मिळवले.
हितेश सोनवाने यांना NIS कुस्ती प्रशिक्षक सुहास बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. कठोर मेहनत, जिद्द आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत पदकाची कमाई केली. त्यांच्या या यशामुळे गोंडवाना विद्यापीठातील खेळाडूंना नवीन प्रेरणा मिळाली आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, संचालक शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अनिता लोखंडे व विद्यापीठातील सर्व क्रीडा प्रेमींकडून सोनवाने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचे विद्यार्थी आणखी मोठी कामगिरी करतील, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे.



