चंद्रपूरविदर्भ

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी मूल आणि बल्लारपूरमध्ये

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहीर सभेला विशेष उपस्थिती 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक, माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि बल्लारपूर मतदारसंघाचे लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन सोमवार, १ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. मूल येथे सायंकाळी ५ वाजता आणि बल्लारपूर येथे सायंकाळी ७ वाजता ही सभा पार पडणार असून, या सभेमध्ये महाराष्ट्राच्या घराघरात ओळख निर्माण केलेली “सैराट” फेम आर्ची अर्थात लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू विशेष उपस्थित राहणार आहे.

मूल येथील गुजरी चौकात आणि बल्लारपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ, रिंकू राजगुरू नागरिकांशी संवाद साधणार असून, युवक, महिला आणि सर्व नागरिकांसाठी ही प्रेरणादायी भेट ठरणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button