क्राईमगोंदियाविदर्भ

हेल्थ पॉलिसीचे आमिष दाखवून २५.५६ लाखांची फसवणूक

नागपूर येथील आरोपी हेमंत राखडे व साथीदारावर रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल

गोंदिया : गोंदिया येथील एका तरुणाला ‘बजाज फायनान्स कंपनीची प्री-मॅन्युअर्ड हेल्थ पॉलिसी काढून देतो,’ असे आमिष दाखवून आरोपींनी तब्बल २५ लाख ५६ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २१ ऑगस्ट ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या प्रकरणी २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हेमंत लखन राखडे (वय ३८, रा. नागपूर) व त्याच्या साथीदाराने हितेंद्र सुनील निर्विकार (वय २५, रा. बी.एम. पटेल वॉर्ड, कन्हारटोली, गोंदिया) या तरुणाला ‘प्री-मॅन्युअर्ड हेल्थ पॉलिसी’ काढून देण्याचे आमिष दाखवले. पॉलिसीसाठी लागणारे मंजुरी शुल्क, होल्ड चार्जेस, डिमांड ड्राफ्ट फी आणि पेनल्टी चार्जेस अशा विविध कारणांखाली आरोपीने वेळोवेळी मोठ्या रकमांची मागणी केली.

हितेंद्रने विश्वासावर येऊन आरोपी हेमंत याच्या बँक खात्यात एकूण २५ लाख ५६ हजार रुपये जमा केले. मात्र, आरोपीने कोणतीही हेल्थ पॉलिसी न देता संपूर्ण रक्कम हडप करून हितेंद्रची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हितेंद्रने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेसंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button