गडचिरोलीविदर्भ

देसाईगंज तालुक्यात खरीप धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

देसाईगंज : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. यांच्या शासकीय आधारभूत धान खरेदी योजना (खरीप पणन हंगाम २०२५-२६) अंतर्गत देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या कोरेगाव केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. ७) माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शासकीय आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर चोप, कोरेगाव, बोडधा, रावणवाडी आणि शंकरपूर केंद्रातील समाविष्ट गावातील शेतकऱ्यांचे धान देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेतर्फे खरेदी केले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यात शेतकरी प्रेमदास चहांदे यांच्या धानाची मोजणी करून केंद्राचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावर साधारण भात (धान) आणि ग्रेड ए चे भात (धान) शासकीय दराने खरेदी केले जाणार आहे.

उद्घाटन सोहळ्याला देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष अन्नाजी तुपट, सरपंच धनंजय तिरपुडे, माजी सभापती मोहन गायकवाड, व्यवस्थापक पी.के. तलमले, तुकाराम गायकवाड, पोलीस पाटील खुशाल मस्के, चेतन मस्के, भागवत गायकवाड, ऋषी गायकवाड, कृष्णा पुस्तोडे, चित्तरंजन नाकाडे, सुधिर गायकवाड, गितेश मस्के, सागर वाघाडे उपस्थित होते.

देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाने परिसरातील शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button