गोंदियाविदर्भ

मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संविधान दिन साजरा

गोंदिया : मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संविधान दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शासनाने शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याबाबतचा सामंजस्य करार केलेला आहे. वर्ष 2025 ते 2030 या पाच वर्षांमध्ये सर्व शाळांमध्ये मूल्य आधारीत शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी या अंतर्गत सर्व शाळांमध्ये शिक्षक गण, मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक यांच्या सहकार्याने कार्यक्रम केले जात असून या अंतर्गत संविधान दिवस साजरा करण्यात आला.

गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे, नागरिक म्हणून कर्तव्य भावना विकसित करणे, व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगणे, संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्याची माहिती देणे, चित्रकला व पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे, संविधानाच्या मूल्याबाबत कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे, प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधान विषयक ज्ञान वाढविणे, स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण करणे, पथनाट्य माध्यमातून समाजात संविधानिक मूल्याची जनजागृती करणे, विद्यार्थ्यांमध्ये नाट्याद्वारे अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे, पोवाडा आणि गाणी सादरीकरण लोककलेच्या माध्यमातून संविधानाबद्दल अभिमान निर्माण करणे, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती विकसित करणे, मानवी साखळी निर्मितीतून संविधानातील एकता व अखंडता या मूल्याचा अनुभव देणे, विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक कार्यासाठी आवश्यक समन्वय वाढविणे, सेल्फी पॉईंट आय लव कॉन्स्टिट्यूशन- विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडणे, सकारात्मक प्रचाराद्वारे संविधान दिन लोकप्रिय करणे, हस्तकला स्पर्धा- विद्यार्थ्यांच्या हस्त कौशल्याला वाव देणे, संविधानातील प्रतिक, चिन्हे याची ओळख करून देणे, असा शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचा उद्देश असून याप्रकारे उपक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

या कार्यक्रमाद्वारे संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना आवड, जागरूकता व कला-गुणांचा वाव मिळेल. संविधान दिवस साजरा केला या संदर्भातील अहवाल प्रत्यक्ष शाळांनी गुगल लिंकच्या माध्यमातून राज्य शासनास सादर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button