
कूरखेडा : बहीण-भावाचे प्रेम वृद्धिंगत करणारा पर्व म्हणजेच रक्षाबंधन. या निमित्त येथील महिला भगिनींनी पोलीस स्टेशन कूरखेडा येथे १९ ऑगस्ट रोजी पोलीस दादांना राख्या बांधत त्यांचाकडून सूरक्षेची हमी घेतली.
पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात महिला भगिनींनी पारंपरिक पध्दतीने औक्षण व तिलक करीत उपस्थित सर्व पोलीस बांधवाना राख्या बांधल्या व त्यांचा कडून शहरातील शांतता व सूव्यवस्था कायम राखत महिला सूरक्षेची हमी घेतली. यावेळी ठाणेदार महेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, पोलीस उपनिरीक्षक हिरामन गायकवाड़, तसेच भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष रूपाली कावळे, जिल्हा सचिव शितल लांजेवार, सहसचिव रंजू मेश्राम, शोभा दहिकर, रेखा रामटेके, कीर्ती बगमारे, शोभा दहिकर, वच्छला कसारे, पूष्पा सोरते, संगीता मडावी, आशा जांभूळकर तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.



