गडचिरोलीविदर्भ

जिल्हा परिषदेची पदभरती पूर्णपणे पारदर्शक; दलालांपासून सावध राहा : सीईओ सुहास गाडे यांचे आवाहन

गडचिरोली : “जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सरळ सेवा व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही शासन निर्णयानुसार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि प्रामाणिकपणे राबवली जात आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही दलाल, मध्यस्थ अथवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये,” असे स्पष्ट आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

या संदर्भात माहिती देताना सीईओ सुहास गाडे म्हणाले की, जिल्हा परिषदेतील गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा, पदोन्नती आणि बदली प्रक्रियेद्वारे भरली जातात. त्याचप्रमाणे, अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, संवर्गातील उपलब्ध जागा आणि ज्येष्ठता यानुसार पूर्णपणे पारदर्शक समुपदेशनाच्या माध्यमातून नियुक्त्या दिल्या जातात.

त्यामुळे, कोणत्याही व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी न पडता केवळ आपल्या पात्रतेवर आणि शासनाच्या नियमांनुसार होणाऱ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button