गडचिरोलीविदर्भ

ताडगुडा येथील १७ शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यांचे अर्ज उपविभागीय कार्यालयात सादर ; हर्षवर्धनबाबा आत्राम यांचे नेतृत्व

माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात शेतकरी हक्कासाठी एकवटले ; ‘२००५’ पूर्वीच्या वहिवाटीला मिळणार कायदेशीर आधार

अहेरी : तालुक्यातील आरेंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ताडगुडा येथील १७ अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यांचा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आज अहेरी येथील उपविभागीय कार्यालयात हे दावे अधिकृतपणे सादर करण्यात आले. उपविभागीय कार्यालयातील अधिकारी अमोल गेडाम यांनी हे अर्ज स्वीकारले.

ताडगुडा गावातील शेतकरी सन २००५ पूर्वीपासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करत आहेत. मात्र, कायदेशीर मालकी हक्क नसल्याने त्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा अहेरी विधानसभेचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनहक्क कायदा २००६ (नियम २००८ व सुधारित २०१२) नुसार या शेतकऱ्यांचे वैयक्तिक वनहक्क दावे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी ताडगुडा गावातील १७ गरजू शेतकऱ्यांच्या अर्जांचे संकलन करून ते अहेरी उपविभागीय वनहक्क समितीकडे (SDO कार्यालय) सादर केले. या अर्जांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिनीचा प्रश्न मार्गी लागून शेतकऱ्यांना शेतीसाठी कायदेशीर संरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी शेतकऱ्यांच्या हक्काचा पाठपुरावा करण्यासाठी बाळाजी गावडे जिल्हा सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (माजी सरपंच, येरमनार), कैलास कोरेत जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नागेश मडावी अहेरी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, संबय्या करपेत (माजी सरपंच, कमलापूर), मुरा आत्राम (सदस्य, आरेंदा ग्रा.पं.), बाळाजी तलांडी (पाटील, ताडगुडा), रमेश कुळमेथे, दसा आत्राम, अमरनाथ गावडे, रितेश गावडे, उमेश पोरतेट, आकाश राऊत, तिरुपती मडावी, राजू तलांडी यांच्यासह ताडगुडा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहेरी उपविभागीय कार्यालयाने हे अर्ज स्वीकारल्यामुळे ताडगुडा परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या पुढाकारामुळे आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनामुळे वनहक्क दाव्यांची प्रक्रिया गतिमान झाली असून, लवकरच या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button