गडचिरोलीविदर्भ

सिंचन, रस्ते आणि हक्काचा मोबदला! ; डॉ. देवराव होळींच्या ‘जनसंवाद’ यात्रेत मागण्यांचा पाऊस

सर्किट हाऊसवर गाऱ्हाण्यांची सुनावणी ; रखडलेले सिंचन प्रकल्प आणि रेल्वे नुकसानभरपाईचा प्रश्न तापला

गडचिरोली : माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी २६ जानेवारीपासून सुरू केलेल्या ‘जनसंवाद यात्रे’चा टप्पा आता गडचिरोली शहरात पोहोचला आहे. स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित विशेष संवाद बैठकीत नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचे आणि समस्यांचे जणू गाऱ्हाणेच डॉ. होळी यांच्यासमोर मांडले. सिंचन प्रकल्पांपासून ते रेल्वे जमिनीच्या मोबदल्यापर्यंतच्या अनेक गंभीर प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी उपसा सिंचन: वसा–पोर्ला आणि वाकडी–मसली उपसा सिंचन योजनांना तात्काळ निधी देऊन मंजुरी द्यावी. कोटगल प्रकल्प: कोटगल उपसा सिंचन योजनेतील त्रुटी दूर करून पाणी न पोहोचलेल्या गावांना न्याय द्यावा आणि वाकडी गावाचा यात समावेश करावा. दळणवळण: कुंभी व माडे मूल दरम्यान मोठा पूल, कारवाफा प्रकल्प आणि गडचिरोली ‘रिंग रोड’ प्रकल्पास गती द्यावी. पांदण रस्ते: ‘मातोश्री’ व पांदण रस्त्यांच्या निधीत वाढ करून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामे स्थानिक मजुरांनाच द्यावीत. इत्यादी मागण्या मांडल्या.

केवळ विकासकामेच नव्हे, तर नागरिकांच्या हक्काच्या मोबदल्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. रेल्वे प्रकल्प: गडचिरोली–वडसा रेल्वे मार्गात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी. पेसा क्षेत्र: १७ संवर्ग व पेसा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न निकाली लावावा. प्रशासकीय दर्जा: मुरखळा–नवेगाव ग्रामपंचायतीला ‘नगरपंचायत’चा दर्जा द्यावा आणि लोकसंख्या वाढलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन करावे. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

“जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हाच ध्यास” – डॉ. देवराव होळी

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. देवराव होळी म्हणाले की, “गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. सिंचन, रस्ते आणि क्रीडांगण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान आणि कर्मचाऱ्यांचे मानधन या प्रश्नांवर मी वैयक्तिक लक्ष घालून ते मार्गी लावेन.”

या बैठकीला विलास भांडेकर (जिल्हाध्यक्ष, किसान आघाडी), विलास दशमुखे, दत्तू सूत्रपवार, मोरेश्वर भांडेकर, आकाश सातपुते, लोमेश कुळमेथे, रमेश नैताम, किरण चाचणे, भूषण अलामे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. होळी यांच्या हस्ते उपस्थितांना नवीन वर्षाच्या डायरीचे वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button