गोंदियाविदर्भ

गोंदियात रंगणार संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव ; ६ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

गोंदिया : येथील डब्लिंग कॉलनी परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात यंदा प्रगट दिन महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गजानन महाराज स्मारक संस्था, गोंदिया यांच्या वतीने ६ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा भक्तिमय सोहळा संपन्न होणार असून, यात ग्रंथ प्रकाशन, पालखी सोहळा आणि कीर्तनादी कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.

ग्रंथ प्रकाशन व नाट्य संगीत (शुक्रवार, ६ फेब्रुवारी): महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळी ५:०० वाजता डॉ. श्रीकांत गोडबोले लिखित ‘नमन नटवरा’ या ग्रंथाच्या प्रकाशनाने होईल. यावेळी डॉ. सुधीर जोशी आणि पं. जनार्दन पंत लाडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यानंतर नागपूरच्या ‘स्वर आराध्य प्रतिष्ठान’तर्फे नाट्य पदांचे सादरीकरण करण्यात येईल.

भव्य शोभायात्रा व पालखी सोहळा (शनिवार, ७ फेब्रुवारी): शनिवारी सायंकाळी ४:३० वाजता श्रींच्या पालखीचे व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करेल.प्रगट दिन मुख्य सोहळा (रविवार, ८ फेब्रुवारी): मुख्य प्रगट दिनानिमित्त सकाळी ९:०० वाजता श्रींचा अभिषेक, सत्यनारायण पूजा, आरती व प्रसाद वितरण होईल. सायंकाळी ४:३० वाजता इंदोर येथील प्रसिद्ध कीर्तनकार श्रुती भांडारे यांचे सुश्राव्य कीर्तन रंगणार आहे. ९ फेब्रुवारी: सायंकाळी ४:३० वाजता श्रुती भांडारे यांचे कीर्तन व ७:०० वाजता गोपालकाला व काल्याच्या प्रसादाचे वितरण. १० फेब्रुवारी: सायंकाळी ४:३० वाजता ‘गीत गंधर्व’ हा सांगीतिक कार्यक्रम. ११ फेब्रुवारी: श्रीरामदास नवमी निमित्त सायंकाळी ४:३० वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संत गजानन महाराज मंदिर, डब्लिंग ग्राउंड, सिव्हिल लाईन, गोंदिया येथे आयोजित या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव समिती वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button