भंडाराविदर्भ

११ वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

सीतासावंगी येथील न्यू कॉलनी परिसरातील घटना ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

तुमसर : तालुक्यातील सीतासावंगी येथील न्यू कॉलनी परिसरात गुरुवार १९ फेब्रुवारीला एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मानवता संजय चौरे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. भरदुपारी १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

मानवता ही तुमसर येथील यूएसए विद्यालयाची इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी होती. गुरुवार दुपारच्या सुमारास मानवताचे आईवडील घरच्या हॉलमध्ये बसले असताना मधल्या खोलीचे द्वार बंद करून तिने गळफास घेत जीवन संपविले. ही घटना उघडकीस येताच चौरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तिने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button