गडचिरोलीविदर्भ

“उई केअर, उई क्युअर” अंतर्गत गर्भाशय मुख कर्करोग जनजागृती

गडचिरोली : उई केअर, उई क्युअर या संकल्पनेअंतर्गत गर्भाशय मुखाच्या कर्करोग जनजागृती कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे (राज्य आयएमए – एचपीव्ही लसीकरण, गर्भाशय मुख व स्तन कर्करोग समिती अध्यक्षा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व व एचपीव्ही लसीकरणाबाबत माहिती देण्यात आली. तज्ज्ञांनी लवकर निदान व वेळेवर उपचार केल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे स्पष्ट केले. उद्घाटनाच्या निमित्ताने गडचिरोली, चामोर्शी व धानोरा येथील १३ व्हीआयए तपासणीत सकारात्मक महिलांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे मंगेश चिवटे, नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, “उई केअर, उई क्युअर” कार्यक्रमाच्या सहअध्यक्ष ज्योती सुळ मॅसचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली.

तसेच डॉ. छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. प्रवीण किलनाके (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी तथा अध्यक्ष IMA जिल्हा गडचिरोली), डॉ. बागराज धुर्वे (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोगतज्ञ वर्ग-१), डॉ. प्रशांत आखाडे (स्त्रीरोगतज्ञ वर्ग-१), डॉ. अमित साळवे (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. आशिष भांगे (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट), डॉ. उज्ज्वला बोरकर (स्त्रीरोगतज्ञ) तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी असंसर्गजन्य रोग विभागाच्या समन्वयक डॉ. प्रेरणा राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button