गडचिरोलीविदर्भ

प्राणहिता नदीपात्रातील हातभट्टी दारूअड्डे उध्वस्त ; ३४ ड्रम गुळाचा सडवा नष्ट

अहेरी : तालुक्यातील बोरी आणि ओडिगुडम परिसरात वाढत्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात ‘अहिंसक कृती’ करीत प्राणहिता नदीच्या पात्रात लपवून ठेवलेला ३४ ड्रम गुळाचा सडवा पोलिस पाटील व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या जागीच नष्ट केला.

बोरी आणि ओडिगुडम परिसरातील प्राणहिता नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू गाळून तिची विक्री केली जात होती. विशेषतः राजपूर पॅचमध्ये दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, या व्यसनामुळे कमी वयाच्या मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान मुक्तिपथ टीमने बोरी व ओडिगुडम गावाला भेट देऊन चर्चा केली असता ग्रामस्थानी दारु अड्ड्यांमुळे गावावर होणारे दुष्परिणाम लक्षात आणून दिले. त्यानंतर दोन्ही गावांच्या पोलीस पाटलांच्या सक्रिय मदतीने मुक्तीपथ टीमने नदी काठावर शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी झुडपांमध्ये लपवून ठेवलेले ३४ ड्रम गुळाचा सडवा आढळून आला, जो जागीच नष्ट केल्याने विक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात आले यश आले. या परिसरातील अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button